सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : वणी उपविभागातील कला क्षेत्रातील हिरा विनोद आदे यांनी आपल्या जीवनाची यशस्वी घडी बसविण्यासाठी परिस्थितीशी लढा देत यशाची गवसणी घालून आज वणी सारख्या ठिकाणी आपल्या कलेच्या माध्यमातून यशाची शिखर गाठणाऱ्या विनोद आदे यांचा सामाजीक क्षेत्रात काम करणाऱ्या लढा संघटनेच्या वतीने मान्यवरच्या उपस्थितीत सत्कार करून गौरविण्यात आले.
लढा संघटनेच्या वतीने वणी येथील शेतकरी मंदीर येथे युवा संमेलन व भन्नाट काव्य मैफिल कार्यक्रम घेण्यात आला, यात सुप्रसिध्द कवी अनंत राऊत अकोला यांच्या कवितेचा कार्यक्रम व प्रा डॉ संतोष डाखरे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात वणी उपविभागीय भुषण विनोद आदे यांच्या विविध कलागुणाचा सन्मान करून भविष्याच्या वाटचालीसाठी लढा संघटनेच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या, यावेळी लढा संघटनेचे प्रविण खानझोडे, अजय धोबे, विकेश पानघाटे सह विचारपिठावर जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, लक्ष्मी नारायन पत संस्थेचे संजय खाडे, वणी वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे उपस्थित होते, अष्टपैलु कलेचा शिलेदार विनोद आदे यांच्या कला गुणाची पारख करित या प्रसंगी लढा संघटनेच्या वतीने सत्कार करून प्रोत्साहन देण्यात आले, या कार्यक्रमात अनंत राऊत यांच्या कविताचा हजारो रसिकांनी आस्वाद घेतला.
परिस्थितीशी लढा देणाऱ्या विनोद आदे यांचा लढा संघटनेकडून सत्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 01, 2023
Rating:
