सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती गौरीशंकर खुराणा व काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने उपभियंता कार्यालय यांना मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे दुःख निवेदन द्वारे मागणी केली.
मारेगांव तालुक्यामध्ये सध्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु शेतीला पाणी देण्याकरीता विजेची गरज आहे आणि नेमकी शेतकऱ्यांना विजेची गरज भासते त्याच वेळेस वीज पुरवठा खंडीत केल्या जात आहे. सोबतच लोडशेडींग सुद्धा सुरु आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिके सुकत आहे. हे तात्काळ थांबवा असे सभापती श्री खुराणा यांनी संबंधित कार्यालयाला प्रत्यक्ष चर्चा करून सांगितले. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असा सज्जड दमही भरत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला.
मारेगांव तालुका हा मागास तालुका म्हणुन ओळखला जातो. या तालुक्यातील लोकांचे जगणं हे १०० टक्के शेतीवर आधारित असुन, शेती हा मुख्य व्यवसाय आहे. या वर्षीचा हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोरडा दुष्काळ म्हणून मानला जात आहे. यंदा निसर्गाची अवकृपा झाली आहे. असे असताना शेतकऱ्यांनी जगावं की मरावं अशी सद्य स्थिती आहे. अशातच एम.एस.ई.बी. (MSEB) विभागाने लोडशेडींग व सततचा वीजेचा लपंडाव, चिंतेची बाब आहे. आता पिकांना पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांचे रब्बी व खरीप हंगामातील पिके मातीमोल होईल. वीज पुरवठा अत्यन्त आवश्यक आहे. प्रशासने गांभीर्याने निवेदनाची दखल घेऊन मारेगांव तालुक्यामध्ये सुरु असलेले लोड शेडींग व सतत खंडीत होणारा विजपुरवठा बंद करण्यात यावा. दरम्यान,शेकडो शेतकरी बांधव सभापती गौरी शंकर खुराणा व मारोती गौरकार यांच्या सह स्थानिक कार्यकारी अभियंता उपविभागीय कार्यालयावर धडकले. यावेळी तालुक्यातील मार्डी, कुंभा वेगांव, बोटोणी या सर्कल मधील शेतकऱ्यांनी आपले दुःख,सद्य पिकांची स्थिती गहिवरून सांगितले. काय करायचे ते करा पण लोड शेडींग आणि सतत खंडीत होणारा वीज पुरवठा तत्काळ थांबा नाहीतर येत्या ३ दिवसात मारेगांव तालुक्यातील संपुर्ण शेतकरी भाऊंच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून आंदोलन किंवा उपोषण करेल असा गर्भीत ईशारा ही देण्यात आला.
निवेदन देताना मारेगांव तालुका काँग्रेस कमेटीचे युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष आकाश बदकी, अंकुश माफूर, आकाश भेले, शाहरुख शेख, समिर कुळमेथे, धनराज आस्वाले, रॉयल सय्यद, अनिल गेडाम नगरसेवक, धीरज डांगाले, सरपंच राहुल आत्राम, भैय्याजी कनाके, मारोती आत्राम, मोहम्मद अय्याज अब्दुल कादर, मारोती सोमलकर, विशाल सोमटकर, विकास जरीले, गजानन फरताडे, भूषण चेंडे, गौरव आसेकर, प्रमोद रिंगोले, अनिल भोयर यांचे सह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा द्या - काँग्रेस कमिटीची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 19, 2023
Rating: