सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
तालुक्यातील बहुतांश गावात आरो प्लॅन्ट बसवण्यात आले त्यापैकी अनेक गावातील आरो प्लॅन्ट सुरु आहेत, तर काही गावातील आरो प्लॅन्ट धुळखात खात आहे. अशातच लाखापूर येथील मागील 15 दिवसापासून आरो बंद असून येथील आरोचे शुद्ध पाणी नागरिकांना मिळत नसल्याची ओरड तर आहेत, मात्र गावाकऱ्यांना बाहेर खर्च करून पिण्याचे पाणी 20 रुपये मोजून विकत घ्यावे लागत आहे,गावात आरो असून सुद्धा यासाठी खर्च करावे लागतेय ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. गावकऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाणी मिळावे यासाठी हे आरो मशीन प्लॅन्ट लावले मात्र, ग्रामपंचायत च्या दुर्लक्षितपणाने हा प्लॅन्ट गेल्या पंधरा दिवसापासून बंद असून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याने विकतच्या पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे येथील नागरिकांची ओरड आहे.
सध्या पावसाळा सुरु आहे, या पावसाळ्यात पिण्याचे पाणी शुद्ध असणे वा मिळणे आवश्यक असते. मात्र, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना बाहेरून विकत पाणी घेऊन आपली तहान भागविणे सुरु आहे. गावात शुद्ध पाणी मिळावे या करिता अनेकदा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला सुचना देऊनही या आरो मशीन प्लॅन्टकडे, गावातील फवारणी कडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीला स्थानिक नागरिकांनी स्वतः संपर्क साधून त्यांनी सांगितले की, आरो व गावातील आरोग्यच्या दृष्टीने गावात फॉग मशीन फवारणी व पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी आमची मागणी आहे. परंतु हे मागील महिन्याभऱ्या पासून बंद पडले आहे. आरो लवकरात लवकर सुरु करा असे मौखिक सांगितले परंतु याकडे फारसं लक्ष दिले जातं नसल्याने हा सावळा गोंधळ सुरु आहेत.
गट ग्रामपंचायत डोल डोंगरगाव-लाखापूर येथील कारभार तकलादू असल्याचे या निमित्ताने तसेच नागरिकांच्या सांगण्यावरून निदर्शनास येत असून ग्रामसेवक व सरपंच पदाधिकाऱ्यांनी या गंभीर समस्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आरो मशीन आणि गावातील आरोग्याच्या दृष्टीने फॉग मशीन फवारणी करून येथील नागरिकांना दिलासा द्यावा अशी लाखापूर ग्रामस्थांनी मागणी आहे.
मी स्वतः यासाठी आग्रही आहे, मला सुद्धा गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, आरोग्याच्या दृष्टीने गावात फॉग मशीन द्वारे फवारणी व्हावी आणि इतरही योजना राबवून गावाचा विकास व्हावा असे वाटते,परंतु याकडे पाहिजे तसे सहकार्य मिळत नसून, निव्वळ दुर्लक्ष होत असल्यामुळे गावातील काम पेंडिंग राहून जातात.ही सर्वात मोठी अडचण आहे.-शोभा योगीराज बलकीउपसरपंच, गट ग्रामपंचायत लाखापूर (डोल डोंगरगाव)
महिन्याभऱ्या पासून शुद्ध पाणी मिळत नसल्याची नागरिकांची ओरड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 22, 2023
Rating:
