टॉप बातम्या

सुरज जाधव यांची सी आर पी एफ दलात निवड


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगांव तालुक्यातील मौजे वाघदरा (वसंत नगर) येथिल रहिवासी सुरज जाधव यांनी एका गांव खेड्यातुन, आपल्या हालाखीच्या परिस्थितीला मात देत मेहनतीच्या जोरावर केंद्रीय पोलिस दलात (C.R.P.F.) निवड झाली.

सुरजची (C.R.P.F.) दलात निवड झाली याचा आनंद पाहता श्री गुरुदेव सेवा मंडळ वंसतनगर तथा समस्त ग्रामवासी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्र वंदनेने त्याला सलामी देण्यात आली.

या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य श्री. विश्वनाथ पोतुजी आत्राम, गणपत महाराज, माजी सदस्य श्री. दिलीप आत्राम, श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. उमेश चव्हाण, देविदास आत्राम, रतन जाधव, उपाध्यक्ष श्री. गजानन टेकाम इत्यादी गावकरी व प्रतिष्ठित नागरिक या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
Previous Post Next Post