टॉप बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; विद्युत तार चोरट्यास अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी, मारेगांव, शिरपुर, राळेगाव, वडगांव जंगल पो.स्टे. हद्दीतुन तार व केबल चोरी करणाऱ्या टोळीतील एकास ताब्यात घेतले आहे. आरोपीला खाकीचा हिसका दाखवताच व त्याची चौकशी करताच ठिकठिकाणावरून चोरी केल्याची त्यांने कबुली दिली. त्यावरून 7 लाख 72 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करुन सहा गुन्हे उघडकीस आणले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी केली.

एक इसम टाटा सुमो वाहनात चोरीचा अल्युमिनीयम तार घेवून घोन्सा टि- पॉइन्ट वरून वणी शहरात प्रवेश करणार आहे. अशी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारावरून पथकाने घोन्सा टि पॉइन्ट वणी येथे सापळा रचुन एका टाटा सुमो वाहनास थांबवुन चालकास नांव व पत्ता विचारला. आरोपी सैय्यद अब्दुल अली, (44), रा. फुकटवाडी गुरु नगर वणी. ता. वणी जि. यवतमाळ ह. मु. खान साहाब प्लॉट खिडकीपुरा नेर, याच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता त्यास विद्युत तारा आढळून आल्या. दरम्यान, त्याची चौकशी केली असता विद्युत तार ही दोन दिवसांपूर्वी त्याचे दोन साथीदार अनिल यमुलवार, दिनेश मेश्राम यांचेसह मिळून कायर जंगल परिसरातून कटरचे सहाय्याने तोडली असल्याचे व सदरची तार तोडुन छोटे तुकडे करून लपविण्यासाठी वणी येथे नेत असल्याचे सांगितले. तसेच इतरही ठिकाणी चोरी केल्याची त्याने सांगितले.


Previous Post Next Post