सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
देशोन्नतीचे मारेगाव तालुका प्रतिनिधी सुरेश नाखले यांचे वडील श्री. तानबाजी नाखले यांचे वयाच्या 80 व्या वर्षी अल्पश्या आजाराने नागपूर येथील मेदांता रुग्णालयात रात्री दोन वाजता निधन झाले. त्यांचा अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून आज दुपारी बारा वाजता निघणार असून मार्डी येथील मोक्षधामात अंत्यविधी होतील.
तानबाजी नाखले यांच्या कार्या बद्दल सांगायचं म्हटल तर ते मार्डी येथील माजी सरपंच, मुख्याध्यापक, मार्डी येथील तंटामुक्ती समितीचे पहिले अध्यक्ष तसेच इंदिरा स्मृती मंडळ, मारेगाव या शिक्षण संस्थेचे संचालक होते. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सिंहाचा वाटा असायचा.
तानबाजी यांच्या अशा अकाली निधनाने नाखले कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हरवल्याने मार्डी परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्यास बळ मिळो व त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वर चरणी पार्थना.
"सह्याद्री चौफेर" परिवारातर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
पत्रकार सुरेश नाखले यांना पितृशोक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 16, 2023
Rating:
