सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
सदर शिबीरामध्ये प्रत्येक रुग्णाची डोळ्यांच्या साथीचे निदान केले जाणार आहे. तसेच आलेल्या रुग्णा पैकी कोणाचीही हेळसांड होणार नाही याकडे जातीने लक्ष घेतलं जाणार असून शिबीरांचे आयोजन करुन तालुक्यातील प्रत्येक रुग्णाच्या आरोग्याची काळजी शिबिरामार्फत घेण्याचा मानस आयोजकांच्या वतीने व्यक्त केला. रविवार दि.6 ऑगस्ट 2023 पासून या शिबिराला सुरुवात झाली असून मारेगाव येथे 8 ऑगस्ट, मार्डी येथे 9 ऑगस्ट तर, नवरगाव (धरण) येथे 10 ऑगस्ट ला संपन्न होणार आहे, असे या भव्य डोळ्यांच्या साथ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,या शिबिरामुळे दुर्गम भागातील जनतेला खूप मोठा फायदा होणार आहे. काल रविवारी (6 ऑगस्ट) रोजी कुंभा येथील शिबीरात असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.