डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाला दिली पुस्तकं भेट


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : संगणक, मोबाईल चे युग जरी असले तरी या युगात ऑफलाईन वाचनाची आवड लागावी हा उद्दात हेतू बाळगून येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला अध्यक्ष संजय जिवने यांनी दोन पुस्तकं भेट दिली.

युगसाक्षी बहुउद्देशीय संस्था टाकरखेडा, चे संस्थापक अध्यक्ष संजय जिवने यांनी माधव नगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, येथे दि.26 ऑगस्ट रोजी लेखक भानुदास पोपटे गुरुजी यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अलिखित संदर्भ.. खंड (1) खंड (2) असे दोन पुस्तकं भेट देण्यात आली.

दरम्यान, वाचनालयाची भेट घेतली, यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मा. बाबाराव ढवस हे उपस्थित होते. अध्यक्ष ढवस यांनी वाचनालयाचे सर्व कार्यकारिणीच्या वतीने अध्यक्ष संजय जिवने यांचे आभार मानले.
Previous Post Next Post