उपसरपंच यांच्या मागणीला यश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वनोजा देवी येथे रस्त्यावरील उघड पडलेल्या डिपी बॉक्स ला झाकण नसल्याने नकळत विजेचा धक्का लागण्याची शक्यता येथील उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी यांनी संबंधित विभागला लेखी स्वरूपात व्यक्त केली होती. याबाबत 'सह्याद्री चौफेर" ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यांना नवीन डिपी बॉक्स व गावाच्या नाला काठावरील इलेक्ट्रीक पोल चा जमिनीखालील भाग पूर्णतः,सपोर्ट नसल्याने तो कधीही पडू शकतो अशी दाट शक्यता होती, त्यापासून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील होणार अनर्थ टाळता येईल या सामाजिक जाणीवेतून उपसरपंच भंडारी यांनी गावातील सामाजिक कार्यकर्ता बंडू पुनवटकर यांच्याशी चर्चा करून महावितरण विभागाला निवेदन दिले. व दोन्ही बाबीची मागणी करण्यात आली. संबंधित विभागाने निवेदनाची दखल घेऊन वनोजा येथील डिपी वर नवीन डिपी बॉक्स लावून दिला तर, नाला काठावरील इलेक्ट्रीक पोल ला आणखीन पोल चे सपोर्ट देऊन त्याला स्टॅन्ड केले.  महावितरणने दखल घेऊन कामाची तत्परता दाखवली, यामुळे त्यांचे उपसरपंच भंडारी व सामाजिक कार्यकर्ते बंडुजी पुनवटकर यांनी महावितरण अभियंता व कर्मचारी यांचे आभार मानले.