Top News

सुरक्षित फवारणी चित्ररथाला दाखवली तहसीलदारांनी हिरवी झेंडी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील कृषि विभाग, कृषि विभाग पं.स.मारेगांव व सिंजेटा कपंनी यांचे संयुक्त विद्यमाने फवारणीबाबत ग्रामस्तरावर जनजागृती करण्यासाठी आज दि.18 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय मारेगांव येथुन सुरक्षित फवारणी चित्ररथाला तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

या जनजागृती अंतर्गत स्प्रे ड्रिफ्ट, कीटकनाशके वापरताना कधीही खाऊ नका, धूम्रपान करू नका, पिऊ नका किंवा चघळू नका, नियमानुसार आवश्यकतेनुसार आपत्कालीन वैद्यकीय सेवा आगाऊ प्रदान करा, तसेच कीटकनाशके वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे जसे की, फवारणी करताना नाक, तोंड आणि डोळे झाकणे, मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवणे, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कीटकनाशकांचा अतिवापर रोखणे कारण ते पाणी आणि मातीचे प्रदूषण देखील करतात. नागरिकांच्या माहितीकरिता आज शुक्रवार रोजी कृषि विभाग, कृषि विभाग पं.स.मारेगांव व सिंजेटा कपंनी यांच्या संयुक्त विद्यमाने फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबत ग्रामस्तरावर जनजागृती करण्यासाठी सुरक्षित फवारणी चित्ररथाला तहसिलदार श्री. निलावड, यांनी हिरवी झेंडी दाखवली. 

आजपासून पुढील दोन दिवस हा चित्ररथ मारेगांव तालुक्यातील सर्व गावात जावुन फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबत व्यापक प्रचार व प्रसिध्दी करणार आहे. यावेळी तालुका कृषि अधिकारी सुनिल निकाळजे, संदीप वाघमारे पं स.कृषि अधिकारी (सा.), महसूल अधिकारी श्री.गुघाने, श्री मत्ते, तलाठी यांची उपस्थिती होती.
Previous Post Next Post