Top News

सातपुते सरांना कायमस्वरूपी द्या - शाळा व्यवस्थापन समितीची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : महागांव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचे पद रिक्त आहेत. शिक्षक एकही नसल्याने गावकऱ्यांनी शाळेला शिक्षक द्या अशी मागणी मागील दिलेल्या निवेदनातून केली होती.

पालकांच्या मागणीची शिक्षण विभागाने दखल घेत महागाव (सिंधी) येथील जि प शाळेला सातपुते सर देण्यात आले. मात्र त्यांना कायमस्वरूपी शिक्षक म्हणून देण्यात यावे असे, निवेदन आज मंगळवारला शाळा व्यवस्थापन समिती, महागाव व पालक यांच्या वतीने मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

सातपुते सरांना कायमस्वरूपी द्या या मागणीसाठी महागांव (सिंधी) शा.व्य.स. चे अध्यक्ष गजानन लांबट, सौ ज्योती वाकडकर, सौ मंगला दूधकोहळे, गणेश खुसपुरे, सुधाकर आत्राम, सरपंच अविनाश लांबट, ग्राम. सदस्य संगीता वाघाडे, यासह पालक राजु मरस्कोल्हे, मुरलीधर बल्की, दादाराव टेकाम, दिलीप आत्राम, नागो मरस्कोल्हे, दिपक वाकडकर, रमेश येरमे, चंद्रभान मेश्राम, व अंकुश आत्राम आदींसह गावकरी उपस्थित होते. 

तालुक्यातील 11 जि.प. शाळेत एकही शिक्षक नाही. 121 शिक्षकांची कमतरता आहे, वास्तविकता हा विषय गंभीर आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. असे असतांना शिक्षण विभाग निद्रावस्थेत असल्याची ओरड संपूर्ण तालुक्यात आहे. येथील गटशिक्षणाधिकारी यांना वारंवार निवेदन मागणी सुरुच आहेत. मात्र शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहेत. 




Previous Post Next Post