चिंचाळा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज चिंचाळा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला. या उत्सवाला गावातील युवक युवती, जेष्ठ नागरिक, पुरुषमंडळी यासह महिलांमंडळीची उपस्थिती लक्षणीय पहायला मिळाली. श्री किशोरभाऊ उलमाले यांच्या शेतात,(मारेगाव रोड) येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.

सतत ९ वर्षांपासून संपन्न होत असलेल्या या गुरुपौर्णिमा महोत्सवात गावातील भाविक भक्त एकत्रित येवून सर्वधर्म समभावाने हा उत्सव साजरा केला जातो, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गुरुपौर्णिमेचे आयोजन केले होते. आज सोमवारला गुरुपौर्णिमेनिमित्त १ वाजता पालखी काढुन साई मंदीर ते गावातील मुख्यमार्गाने पालखीची शोभा यात्रा परत साई मंदीर येथे दाखल झाले. या पालखी सोहळ्यात नागरिकांसह महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

कोरोनामुळे मागील काही काळ या उत्सवावर विरजण आले असले तरी गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गावातील भाविकांनी खचून न जाता नेहमीप्रमाणे या पवित्र स्थानी येवून श्रद्धा जोपासली. या अनुषंगाने गावाकऱ्यात एक उत्साहाचे, प्रेम भक्ती चे वातावरण निर्माण होऊन भावभक्तीने पूजन करून हा महोत्सव साजरा करण्यात आला.

या निमित्ताने गावात ग्रामस्वछता राबवून गल्लोगल्ली, घरा-दारासमोर सुशोभीत रांगोळ्या काढुन सर्वत्र भक्तिमय वातावरण पहायला मिळतं. साईंच्या चरणी आत्मसमर्पण करित देहभान हरपून भजन-पूजनाचे आयोजन असते. या वर्षी वरूण राजाने मागील काही दिवसापासून एकदमच दांडी मारल्याने या निमित्ताने त्यालाही भावपुर्ण साकडे घातले. त्यानंतर दही हांडी, काला व शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रमाने गुरुपौर्णिमेची सांगता करण्यात आली, हे विशेष...!!



चिंचाळा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा..! चिंचाळा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा..! Reviewed by सह्याद्री चौफेर on July 03, 2023 Rating: 5
Powered by Blogger.