टॉप बातम्या

'लढा' संघटनेचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांना आर्तहाक...!!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून खाजगी ऑटो, ट्रॅव्हल्सची संख्या ही वाढली आहे. सोबत वाहतूकीचे नियम पायदळी तुडवत मुजोरी करुन वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे वर्दळीच्या आणि अरुंद रस्त्यावर वाहतुक कोंडीला प्रोत्साहन मिळत आहे. याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असून केवळ सामान्यांकडून दंड वसुलीसाठी वाहतुक पोलीस रस्त्यावर उभे राहतात व गोरगरीब दुचाकी स्वारांवरच कायदेशिर कार्यवाही करुन दंड आकारतात.

वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचे सौजन्य वाहतूक विभाग दाखवत नाही. त्यामुळे एकता नगर जवळ वणी-नागपुर येथे चालणाऱ्या ट्रॅव्हल्सचा थांबा मुख्य मार्गावरून हटवून योग्य त्या ठिकाणी हलविण्यात यावा, वणी शहरात अवैध प्रवासी वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक ताडपत्री न टाकताच होत असलेली कोळसा वाहतूक वरोरा रेल्वे गेट जवळ होत असलेली ट्रक पार्किंग यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करावी.
निमशासकीय शाळेत चालणाऱ्या विद्यार्थी वाहतूक वाहनांची तपासणी व आसन क्षमता बघुनच प्रवास करण्याची मुभा द्यावी, बस स्टॉप परिसरातील खाजगी वाहतूक नियमाप्रमाणे २०० मिटरच्या दुर थांबविण्यात यावी.

ह्या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले,येत्या काही दिवसात जर ह्यावर तोडगा निघाली नाही तर आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार.
ह्यावेळी प्रविण खानझोडे, अजय धोबे, विकेश पानघाटे, ललीत लाजेवार, अॅड. रुपेश ठाकरे, राहुल झट्टे, उपस्थित होते.
Previous Post Next Post