नगर परिषद अंतर्गत येणारा मुख्य मार्ग टिळक चौक ते जंगली पीर (दर्गाह) रस्ता नव्याने बनविण्यात यावा - युवासेनेची मागणी
सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्डा किती खोल आहे याचा अचूक अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे अपघातात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नगर परिषद अंतर्गत येणारा मुख्य मार्ग टिळक चौक ते जंगली पीर (दर्गाह) रस्ता नव्याने,या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी तहसीलदार तथा प्रशासक न. प. व मुख्याधिकारी, न.प. वणी यांना युवासेनेद्वारे करण्यात आली.
शहरातील मुख्य व सर्वात वर्दळीचा मार्ग म्हणजे टिळक चौक ते दिपक चौपाटी, मागील एक ते दीड वर्षांपासून या मार्गाची चाळण झाली आहे. मागील वर्षांपासून या मार्गावर अपघाताची जणू मालिकाच सुरू झाली. सदर मार्गावर रोजच अपघात होत आहे. मात्र, प्रशासन गप्प बसले आहे. या रस्त्यासाठी निधी हा जानेवारी 2023 आला असतांना काम मात्र,अजूनही सुरू झालेले नाही. या मार्गावर जेव्हा एखादा मोठा अपघात होईल व कोणत्याही निष्पाप जीवाचा बळी गेल्यावरच रस्ता बांधणीचा मुहूर्त निघणार काय? असा आर्त प्रश्न उपस्थित होत आहे.
सदर रस्त्याचे काम आठ दिवसात पूर्ण न झाल्यास युवासेना या मार्ग बंद करून युवासेना स्टाईलने "रस्ता रोको आंदोलन" करणार आहे. या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा सज्जड दम उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
यावेळी गजेन्द्र घरद, अमित घोटेकर, चेतन उलमाले, तुळशिराम काकडे, अभीजीत सुरशे, महादेव खिरटकर, आकाश बघेल, अमोल मडावी, वजीर खान, मोहसीन शेख, केवल गौरकार, प्रफुल बोरडे, प्रविण मांडवकर, ईश्वर माहुरे, चेतन शेंडे, राजू वाघमारे, सिराज सिद्दीकी, मंगेश उपरे, रुपेश उपरे, राहुल कोलते, किशोर ठाकरे, वैभव कोलते, अब्द चन्नै, संदेश अडपावार, मोहम्मद अविश, अभिषेक बनकर आदींची उपस्थिती होती.
नगर परिषद अंतर्गत येणारा मुख्य मार्ग टिळक चौक ते जंगली पीर (दर्गाह) रस्ता नव्याने बनविण्यात यावा - युवासेनेची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 07, 2023
Rating:
