लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिनी वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी केले आव्हान


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शहरातील लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था वणी चा प्रथम "वर्धापन दिवस" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

याप्रसंगी सर्व अभिकर्त्यांना व कर्मचाऱ्यांना व उपस्थित सभासदांना प्रत्येकी एक झाड वाटप करून झाड लावण्याचा व त्यांना जगवून मोठे करण्याचा संकल्प करण्यात आला. पर्यावरण संतुलन साधण्यासाठी सामाजिक उपक्रम म्हणून सर्वांना झाडांचे वाटप करण्यात आले.

लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेने गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक क्षेत्रात गगन भरारी घेतली असून, या संस्थेने सर्वांचा विश्वास कायम करून कमी वेळात नावलौकिक केले. विविध सामाजिक उपक्रम राबवून पारदर्शक व्यवहार व सर्वसामान्य जनतेला शेतकरी व महिला बचत गटांना सुद्धा आर्थिक प्रगतीचा हातभार लावण्यासाठी ही संस्था गेल्या एक वर्षापासून सतत काम करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व्यापारी उद्योजक व गरजू लोकांना पत पुरवठा करून त्यांचा व्यवसायाला मोठा हातभार लावत आहे. त्यामुळे या पतसंस्थेचा कारभार पाहता सर्वसामान्यांमध्ये कमी वेळात मोठी प्रगती करणारी एकमेव पतसंस्था म्हणून नावलौकिक आले आहे.

या प्रथम वर्धापन दिनाच्या अनुषंगाने संस्थेच्या अध्यक्षा संगीता संजय खाडे, संस्थेचे संचालक संजय रामचंद्र खाडे व ईश्वर खाडे व इतर पदाधिकारी अभीकर्ता, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.
लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिनी वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी केले आव्हान लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिनी वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी केले आव्हान Reviewed by सह्याद्री चौफेर on June 05, 2023 Rating: 5
Powered by Blogger.