Top News

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांची भेट घेऊन आदिवासी बांधव दिल्ली येथून आले परत

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : दिनाक १५ जून २०२३ रोजी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु मॅडम यांची भेट घेऊन आदिवासी कोलाम बांधव दिल्ली येथून सायंकाळी ६. वा.परत आले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा व आदिम नायक शामा दादा कोलाम यांच्या तैलचित्रांना हारार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

क्रांतिवीर शामा दादा कोलाम संघटना,यवतमाळ यांच्या वतीने त्यांचा पांढरकवडा विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री लेतुजी जूनघरे माजी जी. प.सदस्य तथा माजी सभापती राळेगाव, प्रमुख अतिथी मा.श्री.सुदर्शन आत्राम उपाध्यक्ष क्रा.शा.दादा कोलाम संघटना यवतमाळ, मा.श्री.उधव टेकाम साहेब, मा.श्री.संभा मडावी (सा का.), मा.श्री.सुरेश मुंडाले (सामाजिक कार्यकर्ता), मा श्री.हरिभाऊ रामपूरे (समाज सेवक), 
मा.श्री.अमित कुलकर्णी साहेब, मा.श्री.गजानन आत्राम (पोलीस पाटील), श्री.गजानन मेश्राम, श्री.मारोती आत्राम यांचे उपस्थितीत स्वागत सत्कार समारंभ पार पडला. 
सत्कारमूर्ती

श्री राहुल आत्राम अध्यक्ष क्रा.शामा दादा संघटना यवतमाळ, गणेश आत्राम (संघटना सचिव), संदीप आत्राम, अर्जुन आत्राम, अजय आत्राम, दिलीप मलांडे, आकाश टेकाम, बाळू टेकाम, जानराव दडाजे, बंडू कोरझरे, दादाराव टेकाम, अतुल आत्राम, अरविंद आत्राम, गंगाधर आत्राम, लक्ष्मन आसोले, राजू मेश्राम, चिंतामन कासारकर, राजाराम मडावी, रजनी आत्राम यांचा समाजाच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला उस्थितीत संघटनेचे पदाधिकारी श्री.सुनील टेकाम (तालुका अध्यक्ष केळापुर)श्री. दिपक आत्राम (तालुका सचिव), कैलास आत्राम (तालुका अध्यक्ष झरी),  विलास कुमरे (तालुका अध्यक्ष घाटंजी), श्री.ईश्वर आत्राम (तालुका सचिव), घाटंजी, झरी, मारेगाव, केळापुर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व समाज बांधव हजर होते.
Previous Post Next Post