पुन्हा महसूलची धडक कारवाई: रेतीचे अवैध वाहतूक, एक ट्रॅक्टर जप्त


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
  
मारेगाव : वर्धा नदीवरील आपटी दांडगाव कोसारा घाटावर गेल्या काही दिवसापासून अवैध रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरु आहे. या घाटावर जवळपास 10-15 ट्रॅक्टर चोरट्या मार्गाचा वापर करीत वाळूची तस्करी होत आहे. वर्धा नदीवरील बाबतची कुणकुण लागताच भरारी पथकाने मंगळवारचे मध्यरात्री धाड टाकली असून घटनास्थळा वरून नऊ ट्रॅक्टर धारकांनी पोबारा केला तर एक तस्कर ट्रॅक्टरसह जप्त करण्यात पथकाला यश आले आहे.

काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले तहसीलदार निलावाड यांच्या नियोजनबद्ध व नायब तहसीलदार यांचे पथकाच्या व्युव्हरचनेने वाळू तस्करांचे पुरते धाबे दणाणले आहे. वर्धा नदीवर मंगळवारच्या मध्यरात्री तब्बल दहा ट्रॅक्टर घाटात शिरले, विशेष उल्लेखनीय की,वाहने नदी तीरावर जाण्यासाठी दगड, माती, ताटवे टाकून रेती तस्करांनी तुफान युक्ती लढवत शासनाच्या महसूलला चुना लावण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे.

महसूल विभाग ऍक्शन मोडवर आले असून चार दिवसाअगोदर दांडगाव येथील दोन वाहने जप्त करण्यात आली होती. ही कारवाई ताजी असतांना चिंचमंडळ येथील संतोष चिन्हे या वाळू तस्करांचे वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात महसूल विभागाला आणखीन यश आले आहे. 

महसूल विभाग रेती तस्करांवर वॉच ठेवून असतांना तहसीलदार निलावाड यांचे मार्गदर्शनात नायब तहसीलदार अरुण भगत, मंडळ अधिकारी अमोल गुघाणे, तलाठी शिंदे यांचे पथक दाखल झाले. दरम्यान, वाहनाच्या लाईटचा प्रकाश पडताच वाळू तस्करांनी वाहनासह मात्र पळ काढला. यात तब्बल नऊ वाहने पळून जाण्यात यशस्वी ठरले असले..तर एक वाहन महसूल च्या धाडीत अडकले आहे.

      
Previous Post Next Post