टॉप बातम्या

पोलीस पाटील परसराम पचारे अनंतात विलीन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यामधील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटील परसराम पचारे यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता चिंचमंडळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

परसराम नारायण पचारे यांचे रविवार सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 43 वर्ष होते. आज रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. परशुराम पचारे हे मागील 16 वर्षांपासून पोलीस पाटील पदावर कार्यरत होते. गेल्या तीन महिन्यापासून त्यांना अन्ननलिकेच्या कर्करोगाने ग्रासले होते. पचारे यांचेवर नागपूर, मेघे सावंगी येथे सतत उपचार सुरु असतांना त्यांनी आज स्वगृही अखेरचा श्वास घेतला. 

आई,पत्नी, दोन मुले यांसह इतर नातेवाईक व अन्य मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 5.00 वाजता चिंचमंडळ स्मशानभूमी (मोक्षधाम) येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
Previous Post Next Post