सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
पंढरपूर वारी साठी निघालेल्या वारकरी यांचा आदरतिथ्य करून शुभेच्छा दिल्या
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
वारी....संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एक अजब जादूगरी....प्रत्येकवर्षी न विसरता न चुकता आषाढीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे, त्याला डोळेभरून पाहणे ही सच्च्या वारक. याची ओळख! खांद्यावर भगवी पताका घेउन उन्हातान्हात, पाऊसपाण्यात कशाकशाची तमा न बाळगता विठुरायाचे ओठावर अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात.
शेकडो कोस पायी वारी करून फक्त विठोबाचे डोळे भरून दर्शन घेणे हेच या वारीचं साध्यकरून आपलं जीवनसुकर करण्यासाठी पळसोनी, मुधोंनी, झोला परिसरातील सर्व पांढरपूर प्रेमी यांचा पुष्पहार घालून सर्वांचा स्वागत कारण्यात आले.
प्रवीणभाऊ खानझोडे मित्र परिवाराचा उपक्रम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 25, 2023
Rating:
