सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : गांव प्रगत झाले तर राष्ट्र सुधारले असं म्हटलं जात. मात्र, अजूनही काही गावाची पाहिजेत तशी प्रगती झाली नसल्याची दिसून येतेय, त्यांच्या पर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ पोहोचत नाही. किंबहुना माहिती मिळत नाही,या काळात सहज काहीच मिळत नाही. यासाठी संघर्ष करावाच लागतो हे सर्वश्रुत आहे. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित असतांना मात्र, ग्रामीण समस्या, आहे तसाच आहे. सालेभट्टी येथील त्रस्त महिला विविध समस्या घेऊन मारेगाव पंचायत समितीवर धडकल्या. यावेळी पंचायत समितीमध्ये उपस्थित असलेले वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी समस्या जाणून घेतल्या व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यातील वरुड-सालेभट्टी गट ग्रामपंचायत आहे. मात्र या गावांना विविध समस्यांचे ग्रहण लागले असून हे ग्रहण कधी मिटणार असे महिलांवर्गातून बोलल्या जात आहे. गावात अनेक समस्यांचे डोंगर उभे ठाकले आहे. गट ग्रामपंचायत मधील सालेभट्टी येथील पारधी बेडा ते वरुड पांदण रस्ता खडीकरण करून मिळावे, सालेभट्टी ते पाथरी रस्ता खडीकरण करून मिळावे, सालेभट्टी ते मारेगाव रस्ता खडीकरण करण्यात यावा, आर ओ प्लॅन्ट मिळावा, नाली उपसून दुरुस्त करावे, सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण करणे, पाणीपुरवठा नियमित मिळणे, पंतप्रधान आवास योजनेतून ओबीसिंना व इतरांना घरकुल मिळणे, रमाई योजनेतून घरकुल देण्यात यावे अशा विविध समस्याचे निवेदन सालेभट्टी येथील महिलानी पंचायतीत समिती मारेगाव येथे आमदार बोदकुरवार यांना दिले.
निवेदन सादर करतांना सालेभट्टी येथील लीना मिलमिले, उज्वला बोढे, सविता थेरे, सविता जुमनाके, नानेबाई मोहितकर, उषा बोढे, वृंदा म्हैसगवळी, शकुंतला नांदे, सुधाबाई नांदे, पार्वताबाई घुंगरूड, वंदना चार्लेकर, चंद्रकला चार्लेकर, शालिनी नांदेकर, कालिंदा लोखंडे, सुचिता इखारे, निता राऊत, सविता बदखल, रूपा चार्लेकर, रंजना राऊत, वंदना निवल, उज्वला मिलमिले, आदी उपस्थिती होती.
आमदारांनी जाणून घेतल्या सालेभट्टी येथील महिलांच्या समस्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 15, 2023
Rating:
