टॉप बातम्या

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषद उतरणार रस्त्यावर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शिक्षण विभागाकडून ज्या शाळेत एकही शिक्षक नाही अशा शाळांवर संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तात्काळ शाळेवर शिक्षक भरती करण्यात यावी याबाबत अखिल भारतीय सरपंच परिषदच्या वतीने गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, मागणीला वरिष्ठाकडून केराची टोपली दाखवल्याने सरपंच परिषद विद्यार्थ्यांचे भविष्यात होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी उद्या दि.22 जून रोजी धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

शिक्षक भरतीची प्रक्रिया अपयशी ठरत असून राज्यात विद्यार्थ्यांना विशेषत: ग्रामीण भागांतील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी आहे. किंबहुना काही शाळेत शिक्षकच नाही, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मारेगाव तालुक्यातील पालक, शैक्षणिक संघटना, सुशिक्षित बेरोजगार, पदवीधर, सामाजिक संघटना गावोगावातील पुढारी यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, या सामाजिक विषयाला घेऊन एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे,नागरिकांनी तन मन धनाने सहभागी व्हावे अशी आर्तहाक आवाहन करण्यात येत आहे.

तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या शाळा हिवरी, मेंडणी, कानडा, मुक्टा, वेगांव, केगाव, महागांव, टाकळी, रामेश्वर, बामर्डा, मांगली या 11 गावातील जिल्हा परिषद शाळेला गुरुजी नसल्यामुळे या विद्यार्थ्याचा शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हि बाब अतिशय गंभीर आहे, संबंधित विभागाने या शाळांना शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आहे. 
Previous Post Next Post