सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
शुभेच्छा संदेशात अध्यक्ष श्री. लांबट यांनी म्हटले की, शालेय जीवनात दहावीची परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. हा टप्पा यशस्वीपणे पार केल्याबद्दल, यशवंत, गुणवंतांचे मनापासून अभिनंदन. आपल्या या यशासाठी मार्गदर्शन करणारे गुरूजन, पाठबळ देणारे कुटुंबीय या सर्वांचेही अभिनंदन. या परीक्षेतील यशानंतर आपल्याला करिअरचे वेगवेगळे मार्ग खूणावू लागतात. हे मार्ग चोखंदळपणे, डोळसपणे निवडल्यास पुढे यश तुमचेच असेल. असे आवडते क्षेत्र निवडण्यासाठी, त्यात यश मिळावे यासाठी देखील मनापासून शुभेच्छा !
काहीजणांना या परीक्षेतील यशाने हुलकावणी दिली असेल. तर त्यांनी खचून न जाता नव्याने तयारी करावी. त्यासाठी फेर परीक्षेचा पर्याय उपलब्ध आहे, त्याचा अवलंब करावा, असे आवाहनही तालुका अध्यक्ष्यांनी केले आहे.
तालुक्यातील दहावी परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे अध्यक्ष अविनाश लांबट यांच्याकडून अभिनंदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 02, 2023
Rating:
