सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख
कळंब : शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा इ. क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणारे मान्यवर व्यक्ती तसेच प्राविण्य प्राप्त विदयार्थी यांच्या पासुन इतर व्यक्तीना व विदयार्थ्याना प्रेरणा मिळावी या उद्देशाने व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघ च्या वतीने तालुक्यात कात्री येथे ग्रामपंचायत भवन मध्ये गुणवंत विदयार्थी व कर्तृत्वाचा सन्मान सत्कार सोहळा पोलिस मित्र परिवार समन्वय समिती प्रदेश अध्यक्ष डॉ संघपालजी उमरे यांच्या अध्यक्षतेखाली सपन्न झाला .
या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक मनोहर शहारे (सेवा निवृत्त उपअभियंता जि प बांधकाम उपविभाग, तर प्रमुख पाहुणे म्हणुन , कळंब तालुका पत्रकार संघटना अध्यक्ष प्रा रूस्तमजी अंभोरे , प्रा प्रफुलजी चौथे, आयोजक रूस्तम शेख, जि प शाळेचे मुख्यध्यापक सौ रत्नमाला ढुमने, मंगेशजी मलकापुरे पोलीस पाटील,कात्री येथील सरपंच सौ सविताताई गाऊत्रे, इ. मान्यवर उपस्थिती होते,
या प्रसंगी कात्री येथील जि प उच्च प्राथमिक डिजीटल शाळेची विदयार्थीनी कु वैष्णवी अशोकराव वाल्दे (महादिप परिक्षेत उत्तीर्ण), धोत्रा (ता कळंब) येथील सुदाम विद्यालयाचे (स्काऊट गाईड मध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त विदयार्थी व पुरस्कार प्राप्त डॉ सौ माधुरीताई केवटे(कळंब), प्रा मजुंषाताई सागर (वडकी ता. राळेगांव), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्राप्त सौ अनिता ढोले (कात्री) व सौ अनिता तिवसकर आशा वर्कर (कळंब), मनोहरजी सहारे ई. व्यक्तींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ट्राफी, गौरवपत्र, मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे सुत्र संचालन विशालभाऊ वाघ (माजी सरपंच आमला) यांनी केते तर प्रास्ताविक कळंब तालुका विकास मंच चे अध्यक्ष अशोकभाऊ उमरतकर यांनी केले.
या कार्यक्रमाला मालाबाई भुजाडे, चंदाताई आत्राम,पोलीस मित्र परिवार समन्वय समिती कळंब तालुका अध्यक्ष कामील शेख, आकांक्षा सिडाम मॅडम,रविन्द्र दिडपाये, ग्राम पं सदस्य मंगेशजी गाऊत्रे, सौ अर्चनाताई वाल्दे, अशोक वाल्दे,सागर शुक्ला इ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्या करीता दै कळंब नगरीचे जिल्हा प्रतिनिधी जावेद खान, अॅड साजिद चाऊस यवतमाळ, प्रा अंकुश वाकडे सर, डॉ सुनिल चव्हान तहसिलदार साहेब कळंब , सागर वादाफळे कळंब, राजुभाऊ बुरबुरे, प्रशांतभाऊ डेहणकर, रुपेशभाऊ सुचक, सचिन माहुरे, गजानन निकोडे , अमोल चावरे, ग्राम प. कात्री, सागर शुक्ला, कळंब तालुका पत्रकार संघटना इ सहकार्य व मार्गदर्शन केल्या बद्दल राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघ चे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांनी मनपुर्वक आभार व्यक्त केले.
कात्री येथे गुणवंत विदयार्थी व कर्तृत्वाचा सन्मान सत्कार सोहळा सपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 06, 2023
Rating:
