सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : वेकोली च्या गलथन कारभारामुळे दिनांक 21 मे 2023 रोजी दुपारी 12 वाजता क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालय भालर वसाहत येथे आत्महत्त्या करण्यात येत असल्याची माहिती निवेदनातून लाठी येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.
तालुक्यातील लाठी येथील शेतकरी प्रभाकर लक्ष्मण खारकर यांचे उकणी खंड 1 मधील गट क्र 569/2 हे मागील पावसाळ्यात वेकोलीच्या डम्पिंग मुळे संपूर्ण पाण्याने शेत भरल्यामुळे शेतात मोठ-मोठे नाले पडले होते, सदर नाले बुजवण्यासाठी (जमिनीची लेव्हल करून देण्यासाठी) मागील 8 महिन्यापासून ते सतत पाठपुरावा निवेदनाच्या माध्यमातून असो की चर्चेच्या माध्यमातून GM ऑफिस व सब एरिया ऑफिस कार्यालयाला जात होते. मात्र, त्यांना केवळ आश्वासन देण्याच्या पलीकडे काहीही केले नाही. उकणी सब एरिया यांच्या ऑफिस ला सलग 8 महिन्यापासून निवेदन भेटी घेत असताना सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा आश्वासनाच्या पलीकडे काहीही मिळाले नाही अवघ्या काही दिवसात शेतीचा हंगाम येत आहे. मात्र, पोटाची खडगी भरण्यासाठी शेतात पडलेल्या नाल्यामुळे शेती ही वाहता येत नाही. त्यामुळे त्यांच्या शेतात वेकोलीच्या चुकीच्या डम्पिंगमुळे व पडलेल्या नाल्यामळे शेती करणे अवघड झाले आहे.
येणाऱ्या 20 मे पर्यंत क्षेत्रीय महाप्रबंधक यांनी शेतीमध्ये पडलेल्या नाल्यांना माती टाकून बुजवून देण्यात न आल्यास दिनांक 21 मे 2023 ला दुपारी 12 वाजता कार्यालयात जाऊन आत्महत्या करण्यात येईल अशी महिती त्यांनी दिली या आत्महतेला वेकोली प्रशासनातील उपक्षेत्रीय प्रबंधक उकणी व क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नार्थ हे सर्वस्वी जबाबदार असतील अशी माहिती दिली.
लाठी येथील शेतकऱ्यांचा क्षेत्रीय महाप्रबंकाच्या कार्यालयात जाऊन आत्महत्या करण्याचा इशारा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 18, 2023
Rating:
