टॉप बातम्या

अवैध कोळसा तस्करीला आळा घाला- वंचीत बहुजन आघाडीचे निवेदन

सह्याद्री चौफेर| कुमार अमोल 

मारेगाव : पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वर्धा नदीवरील कोसारा पुलाजवळ अवैध कोळसा डेपो उभारण्यात आला आहे. तसेच बोटोनी च्या धाब्या जवळ सुध्दा अवैध डेपो उभरण्यात आला आहे. त्यामुळे दूषित वातावरण निर्माण झाले आहे.

मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कोसारा जवळील वर्धानदीच्या 200 मिटर अंतरावर काही कोळसा माफियाकडून कोसारा घाटाजवळ तसेच बोटोणी धाब्या जवळ कोळशाचा अवैध डेपो उभा करण्यात आला आहे. कोळसा खाणीतून तस्करी झालेल्या कोळसाची अवैध वाहतूक करून या डेपोमध्ये जमा केला जात आहे. त्यानंतर दर दिवशी 50-60 टन कोळशाचा व्यापार करण्यासाठी खैरी ते वडकी मार्गाचा वापर करीत असून, बोटोणी धाब्या जवळ सुध्दा अवैध कोळसा डेपो उभरण्यात आला असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

परिणामी दोनही अवैध डेपोवर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन वंचीत बहुजन आघाडी तालुका शाखा मारेगावच्या वतीने पोलीस स्टेशन, तहसीलदार जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकाना यांना पाठविलेल्या तक्रार अर्जातून दाखल करण्यात आली आहे. निवेदनावर वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतम दारुडे, संजय जिवणे,दिनकर हस्ते मारोती टोंगे, सुरेज जांभुळकर, वसुमित्र वनकर, प्राणशील पाटील, गोरखनाथ पाटील, अनंत खाडे, गंगाधर लोणसावळे, गंगाधर तेलंग यांच्या सह्या आहेत.
Previous Post Next Post