नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या समोर कोळशाच्या काळा बाजारासह अवैध धंदे बंद करण्याचे आव्हान


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरु असलेल्या कोसारा, बोटोणी चोरट्या कोल बाजारासह मटका, अवैध दारू विक्री यातून महिण्याला लाखों रूपयाचा काळा घोडबाजार होत असून तस्करा कडून मुजोरी वाढल्यामुळे परिसरात शांतता व सुव्यवस्था ऐरणी वर आली आहे.

मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कोसारा येथील वर्धा नदी जवळ तसेच बोटोणीच्या ढाब्याजवळ कोळसा माफियानी कोळशाचा चोर बाजार भरवीला आहे. शासन मान्य कोळसा खाणीतून हा कोळसा क्षमते पेक्षा अधिक ट्रक मध्ये भरून कोळसा चोर बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. येथून कोळशाची चोरी केली जात असून चोरून आणलेला कोळसा येथे खाली केल्या जात आहे. जमा झालेला कोळसा खाली ट्रक मध्ये लोड करून काळ्या बाजारात विकला जात आहे. चोर बाजारातुन खरेदी केलेल्या कोळशाची खुल्या बाजारात या कोळशाला 8 ते 9 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. त्यामुळे हा व्यवसाय दोनही ठिकाणी मोठया प्रमाणात फोफावला आहे.

यांचप्रमाणे अवैध दारू विक्री, मटका, भंगार चोरी, वाळूची तस्करी याचे प्रमाणही दर दिवशी उच्चांक गाठत असून कोसारा येथील चोर बाजारात 15-20 ट्रक रोज खाली होत आहे, तर बोटोणी च्या चोरबाजारात 25 ते 30 ट्रक रोज खाली होत आहे. बोटोणीतील कोळसा चोर बाजाराने आरोग्य धोक्यात आले आहे. कोसारा चोर बाजारात संबंधित लोकं मुकाट्याने हात ओले करित असल्याचे बोलल्या जात आहे.

कोसारा पाईन्टवरून व बोटोणी पाईन्ट मिळून लाखों रुपये दर दिवशी निव्वळ नफा या व्यवसायातून माफियाना मिळत असल्याची चर्चा आहे. चोरून आणलेल्या कोळशाच्या चोरट्या बाजारातून लाखों रुपयाचे दर दिवशीचे उत्पन्न असल्यामुळे चोरटे सामान्य माणसा सोबत मुजोरी करीत आहे. वेळीच या चोर बाजाराला आवळ न घातल्यास परिसरात शांतता व सुव्यवस्था ऐरणी वर आली आहे.

यापूर्वीचे एसडीपीओ अपयशी

यापूर्वीचे एसडीपीओ हा चोर बाजार बंद करण्यात अपयशी ठरले आहे. मात्र, नव्याने रुजू झालेले वणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे हे या अवैध व्यवसायाला आळा घालतील अशी सर्व सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

7 दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन

या चोर बाजारात दर दिवशी 50-60 टन कोळशाचा अवैध अवैध व्यापार होत असताना आता पर्यंत ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हा व्यवसाय मोठया प्रमाणात फोफावला आहे. या बाबत वंचीत बहुजन आघाडी तालुका शाखा मारेगाव च्या वतीने निवेदन देण्यात आले होते. सात दिवसांत हा चोर बाजार बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष झाल्यामुळे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. त्या पुर्वी नव्याने रुजू झालेले एसडीपीओ यांनी दखल घेतल्यास कदाचित आंदोलनाची कार्यकर्त्याना काही गरज पडणार नाही. मात्र कोळंसा चोर बाजार बंद करण्याचे त्यांच्या समोरील आव्हान ते कसे पेलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या समोर कोळशाच्या काळा बाजारासह अवैध धंदे बंद करण्याचे आव्हान नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या समोर कोळशाच्या काळा बाजारासह अवैध धंदे बंद करण्याचे आव्हान Reviewed by सह्याद्री चौफेर on May 29, 2023 Rating: 5
Powered by Blogger.