सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
जगाच्या पोशिंद्याची आर्थिक देवाण थांबली आहे. आता मिळेल त्या भावात काही शेतकरी कापूस विक्री करत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा ठेऊन अनेक शेतकऱ्यांनी घरीच कापूस साठवून ठेवला. मात्र, कापसाचे भाव वाढायचे सोडून भाव दिवसेंदिवस घसरत आहे. योग्य भावा अभावी शेतकरी चांगलंच चिंतेत असून हतबल झाला असल्याचे समोर आले आहे.
शेतकऱ्याने उत्पादनाकरिता लावलेला खर्च निघत नसल्याने, कर्ज फेडायचे कसे? घर चालवायचे कसे? असे अनेक प्रश्नाच्या विवंचनेतून बळीराजा आत्महत्याचा मार्ग अवलंबित असल्याचे दिसून येत आहेत. आज ना उद्या भाववाढ होणार या अपेक्षेने बळीराजा कापसाची विक्री करित नसल्याचे वास्तव कोणत्याही नेत्यांनी किंवा लोकप्रतिनिधीना का म्हणून कळत नाही. शेतकऱ्यांना शासनाने जाणिवपूर्वक हतबल करीत त्यांच्यात नैराश्य निर्माण केले आहे याची तसदी शेतकऱ्यांचे कैवारी कधी घेईल...
पांढऱ्या सोन्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यात चिंतेचे सावट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 14, 2023
Rating:
