टॉप बातम्या

वणी : बालकाचे प्राण वाचवण्याकरिता आधार माणुसकीचा सेवा भावी संस्थाच्या वतीने आर्थिक मदत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महावितरणच्या गलथान कारभारामुळे लाठी येथील 8 वर्षीय बालक पियुष संभा माहुरे याला विजेचा स्पर्श झाल्यामुळे जखमी झाला.

या 8 वर्षीय बालकाचा लातूर येथे दिनांक 6 मे पासून उपचार चालू आहे. पियुष यांच्या उपचाराकरिता त्यांच्या वडिलांकडे उपचारा करिता पैसे नसल्याची माहिती आधार माणुसकीचा सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष दिपकभाऊ मत्ते यांना मिळाली त्यामुळे "आधार माणुसकीचा सेवा भावी संस्था" वणीच्या वतीने आज माहुरे कुटुंबाला लाठी येथील निवासस्थानी येऊन 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आकाश सूर तर सचिव उपेश आवारी ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर,नत्थु बोधे,आशिष माहुरे हे उपस्थित होते.
Previous Post Next Post