सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : शहरातील जैन ले-आऊट कृष्णअपार्टमेंट मध्ये बंद खोलीत एका पंचवीस वर्षीय तरुणीचा अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सदर घटनेचा पंचनामा करून वणी पोलिसांनी आईच्या तक्रारी वरून तपासाची गती अतिशय नियोजनपूर्वक करित या प्रकरणातील एकाला 24 तासाच्या आत परजिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे.
मृतक प्रिया देवानंद बागेसर उर्फ आरोही वानखेडे रा. बोर्डा ता.वरोरा, जिल्हा चंद्रपूर असे तरुणीचे नाव असून ती वणी येथील कृष्णअपार्टमेंट मध्ये दोन महिन्यापासून राहत होती. सोमवारी (29 में) ला सकाळी दहा वाजता ती राहत असलेल्या खोलीतून स्थानिकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी त्या रूम मालकाला सांगितले, त्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले तेव्हा तरुणीचा अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. सदर घटनेचा पंचनामा करित या प्रकरणातील "गुढ" काय हे शोधण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांनी युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर तिचा खून झाल्याचे तिच्या शरीरावरील व्रण वरून स्पष्ट झाले. मात्र, मृतदेह अर्धनग्न स्थितीत आढळुन आल्याने घातपाताचीही शक्यता असून प्रकरण संशयास्पद असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला गेला होता.
या प्रकरणातील आरोपी विनोद रंगराव शितोळे रा. शिरोळी ता.वसमत जिल्हा हिंगोली येथून अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली. दरम्यान, खुनाचा कोणताही सुराग हाती लागला नसतांनाही अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करीत सापोनी माधव शिंदे यांनी आरोपीला जेरबंद केले. अवघ्या चोवीस तासांतच या गुलदस्त्यात असलेल्या घटनेचा उलगडा करीत आरोपीला जेरबंद केल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
सदरची कारवाई मा. डॉ. पवन बन्सोड, पोलिस अधिक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप, अपर पोलिस अधिक्षक यवतमाळ, मा. गणेश किंद्रे उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, यांच्या मागदर्शनाखाली पो.नि. श्री प्रदीप शिरस्कर, सपोनि माधव शिंदे, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि अशिष झिमटे, पोउपनि प्रविण हिरे, सफै कांबळे, पोह गजानन होडगीर, पोना अविनाश बनकर, पोना अमोल अन्नेरवार, पोना विजय वानखेडे, पोना इकबाल, पोशि सागर सिडाम, पोशि भानुदास हेपट, पोशि अकाश अवचारे, पोशि शुभम सोनुले व पोस्टे वणी यांनी केलेली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सुरू आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. मृतक तरूणीचे फेसबुक द्वारे विनोद यांचे सोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. तिचा प्रियकर विनोद यांनी तीचा घातपात करून गावी पळून गेल्याची माहिती मिळाली. आरोपीचे नावा व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती नसताना व आरोपी हा बाहेर जिल्ह्यातील असल्याने वणी पोलिस स्टेशन मधिल कर्मचारी व अधिकारी यांनी बुध्दी कौशल्याचा वापर करून,आरोपीची माहिती काढून त्यास त्याचे मुळ गाव शिरोळी ता. वसमत जिल्हा. हिंगोली येथून चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मर्डर मिस्ट्री: तिचा अखेर खून'च केला गेला, आरोपीला ठोकल्या बेडया
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 30, 2023
Rating:
