सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : तालुक्यातील विविध भागांत सोमवारी रातपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह होत असलेल्या या पावसामुळे कुठे झाडे उन्मळून पडली आहेत तर कुठे विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. वांजरी मार्गांवरील भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक झाडे रस्त्यावर पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.
गेल्या एक महिन्यापासून वणी उपविभागातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पाऊस अधून मधून जोरदार हजेरी लावतोय. आज नांदेपेरा, मजरा,वांजरी यासह इतर भागात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील होता. त्यामुळे वणी नांदेपेरा मार्गांवरील ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्याचा सर्वात जास्त फटका वांजरी भागात फटका बसला असून येथील एका वीट फॅक्ट्ररी चे शेड उडून गेले आहे. मात्र, जीवितहानी कुठे झाल्याचे चित्र नसून. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; वांजरी मार्गांवरील झाडे जमीनदोस्त, वीज पुरवठा खंडीत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 30, 2023
Rating:
