माणिक कांबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा

 
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील निर्भीड, निष्पक्ष पत्रकार माणिक कांबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मारेगाव तालुका सरपंच परिषद तथा माणिकराव कांबळे मित्र परिवार यांच्या वतीने विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. यात 19 मे च्या सायंकाळी 6 वाजता केक कापून त्यांना त्यांच्या जन्म दिनाच्या दिलखेचक शुभेच्छा देण्यात आल्या. त्याअगोदर विश्रामगृह येथे माणिकराव यांचे शाल व गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला. 

प्रत्येक माणसाची यशस्वीता ही त्याच्या पुढच्या पिढीच्या यशस्वीतेवर अवलंबून असते. भाऊसाहेब माणिकराव कांबळे यांच्या लेखणीतून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतो म्हणून तालुक्याच्या पत्रकारितेत मोलाचे योगदान असल्याचे गौरवद्गार आयुष्मान कांबळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री सुरेश भाऊ लांडे, उपसरपंच (देवाळा) यांनी केले आहे. 

या अभिष्टचिंतन सोहळ्यात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे सचिव सुरेशभाऊ लांडे, उपसरपंच प्रशांत भंडारी (वनोजा), कोथुर्ला येथील सरपंच श्रीकांत गौरकर, टाकळी येथील सरपंच गजानन आदेवार, मांगली येथील उपसरपंच दिलीपराव आत्राम, गोंड बुरांडा ग्रामपंचायत सदस्य नंदू पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रवीणभाऊ बोथले, कवडू चिंचोलकर, पत्रकार भास्कर राऊत, सुरेश नाखले, भय्याजी कनाके, सुरेश पाचभाई, कुमार अमोल, यांच्या उपस्थिती सह वानखेडे साहेब, फुलझेले, रामटेके, देठे साहेब, सहारे, यांचा समावेश होता. यावेळी जेष्ठ पत्रकार माणिकराव कांबळे यांनी उपस्थित मान्यवर तथा मित्रपरिवार यांचे आभार मानले.
माणिक कांबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा माणिक कांबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा Reviewed by सह्याद्री चौफेर on May 19, 2023 Rating: 5
Powered by Blogger.