आज वणी येथे भव्य रक्तदान शिबीर


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : आज दि. 16 मे ला यवतमाळ जिल्हा पोलीस द्वारा वणी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून येथील 'दक्षता हॉल' पोलीस स्टेशन, वणी येथे सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे. 

रक्तदान हेच जीवनदान आहे रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे. रक्त हे कृत्रीमरित्या तयार करता येत नाही तसेच मानवी रक्तघटक ठराविक काळच साठविता येतात त्यामुळे सातत्याने रक्त संकलीत करणे आवश्यक असते. वेळेची गरज, सामाजिक कर्तव्याची जाण ठेऊन रक्तदान हे सुरु राहीले पाहिजे. या उद्दात हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान हे संपूर्णपणे सुरक्षित आहे. द्या रक्तदान सर्वात मोठी पुण्याई, आणि मिळवा आयुष्य भराची पुण्याई... असं म्हटलं जातं.

या शिबीराकरीता आपण सर्व शहरातील रक्तदात्यांनी शिबीरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन डॉ. पवनकुमार बन्सोड (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, यवतमाळ, श्री पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांनी केले आहे.

या शिबिराकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी, पोलीस स्टेशन वणी, पोलीस स्टेशन मुकूटबन, पोलीस स्टेशन शिरपूर, पोलीस स्टेशन मारेगांव, पोलीस स्टेशन पाटण, यांचे सहकार्यातून संपन्न होत आहे.
आज वणी येथे भव्य रक्तदान शिबीर आज वणी येथे भव्य रक्तदान शिबीर Reviewed by सह्याद्री चौफेर on May 16, 2023 Rating: 5
Powered by Blogger.