साखरा दरा येथील गावकऱ्यांनी उठवला स्थानिक प्रशासनाच्या विरोधात आवाज

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील साखरा दरा येथे ग्रामपंचायत संगणक चालक (computer operator) ही जागा खाली आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे.

ग्रामपंचायत च्या एका मासिक सभेमध्ये सरपंच सौ. रजनीताई अशोक पिदुरकर यांनी सुशिक्षित युवकांसाठी या जागेसाठी परीक्षा घेवुन ती जागा भरायची असे ठरवले होते आणि त्या जागेसाठी गावातली गरीब घरातील 10 सुशिक्षित युवकांनी फॉर्म भरले होते. मात्र, सरपंचा सौ रजनी पिदूरकर यांनी ग्रामपंचायत येथील काही सदस्य घेवुन साखरा गावाला पळद्या मागे ठेवून विनायक कांडारकर यांनी निवड करावी अशी शिफारस केली होती. मात्र ते गावातली लोकांना मान्य नाही सर्व गावातली लोक ग्रामपंचायत कार्यालय येथे सभेत हा विषय मांडला.

गावकऱ्यांनी या सभेत तूम्ही शिफारस न करता पात्र असलेल्या गरीब युवकाची निवड करावी असे आवाहन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थापक अध्यक्ष अनंता भाऊ कुंभारे यांची प्रतिक्रिया पहा...
साखरा दरा येथील गावकऱ्यांनी उठवला स्थानिक प्रशासनाच्या विरोधात आवाज  साखरा दरा येथील गावकऱ्यांनी उठवला स्थानिक प्रशासनाच्या विरोधात आवाज Reviewed by सह्याद्री चौफेर on May 14, 2023 Rating: 5
Powered by Blogger.