विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यवस्था परिवर्तनाचा बौध्दिक सिध्दांत आहे - गीत घोष


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : बाबासाहेब हे केवळ एक व्यक्ती नसून ते व्यवस्था परिवर्तनाचा एक सिध्दांत आहेत असे मत अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. गीत घोष यांनी, नांदेपेरा येथील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ ‌बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना व्यक्त केले.

नांदेपेरा येथील भारतीय बौद्ध महासभा तथा महिला मंडळाचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्य ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. खुशालराव रामटेके हे होते तर प्रमुख मार्गदर्शक मा.गीत घोष, राजू निमसटकर, संतोष पेन्दोर, सुरेश शेंडे हे होते.
पुढे बोलतांना घोष म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन व्यवस्था बदलविल्या एक बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन धर्मांधतेवर आधारीत धर्म व्यवस्था आणि पुरोहितशाहीवर आधारीत राज्य व्यवस्था बदलून लोकशाही व्यवस्था निर्माण केली आणि ही सत्ता  परिवर्तनातील क्रांतिकारी बदल घडवून आणणारी एक महान इतिहासीक घटना आहे असे मी मानतो असेही बोलले. याप्रसंगी राजू निमसटकर, संतोष पेंदोर व सुरेश शेंडे यांची देखील भाषणे झालीत.
कार्यक्रमाचे संचालन शंकर शेन्डे, प्रास्तविक रवि वनकर यांनी केले तर आभार चंद्रकांत धोटे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेपेरा येथील भारतीय बौद्ध महासभा तथा रमाई महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य गण यांनी अथक परिश्रम घेतले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यवस्था परिवर्तनाचा बौध्दिक सिध्दांत आहे - गीत घोष विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यवस्था परिवर्तनाचा बौध्दिक सिध्दांत आहे - गीत घोष Reviewed by सह्याद्री चौफेर on April 18, 2023 Rating: 5
Powered by Blogger.