तातापुर श्री.हागोडबुआ देवस्थानच्या सचिव पदी प्रदीप नागोराव भनारकर यांची निवड

सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : विदर्भातील एकमेव भोई समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्री.हागोडबुआ देवस्थान, तातापुर सचिव म्हणून भोई समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व भोई समाजाचे युवा नेते श्री.प्रदीप नागोराव भनारकर यांची निवड झाल्या बद्दल त्यांचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदनसह शुभेच्छा देण्यात येत आहे.
तालुक्यातील भोई समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्री.हागोडबुआ देवस्थान असलेल्या देवस्थानाचे आज गुरुवार दि.06/04/2023 ला भोई समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व भोई समाजाचे युवा नेते श्री.प्रदीप नागोराव भनारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असेच समाजा प्रती ममताभाव असावा, अशी यावेळी अनेकांनी भावना व्यक्त केल्या असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.

दरम्यान, हागोडबुआ देवस्थानचे अध्यक्ष कैलास नान्ने, उपाध्यक्ष लिंबा शिवरकर, कोषाध्यक्ष अमोल कार्लेकर, विश्वस्त प्रकाश पारशिवे, बापू पारशिवे, रमेश शिवरकर, काशीनाथ पारशिवे, बंडु नान्ने, लक्ष्मण करलुके, लक्ष्मण शिवरकर, शेखर नान्ने, रमेश शिवरकर, अर्जून करलुके, संजय नान्ने, सुरेश करलुके, चंदू कामतवार, संतोष मांढरे, गजानन शिवरकर यांचे सहमतीसह समाजबांधवांची उपस्थिती होती.


तातापुर श्री.हागोडबुआ देवस्थानच्या सचिव पदी प्रदीप नागोराव भनारकर यांची निवड तातापुर श्री.हागोडबुआ देवस्थानच्या सचिव पदी प्रदीप नागोराव भनारकर यांची निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on April 06, 2023 Rating: 5
Powered by Blogger.