लालगुडा येथे रामनवमी उत्सव व जगन्नाथ बाबा जन्मोत्सव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विठ्ठल रुखमाई देवस्थान समिती अहेरी द्वारा संचलित विठ्ठल मंदिर लालगुडा येथे रामनवमी उत्सव व जगन्नाथ बाबा जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा काढण्यात आली.

 या शोभयात्रेत प्रभू श्री राम घोड्यावर स्वार असलेली पूर्णपणे लाकडाने बनलेली मूर्ती आकर्षणाचा विषय ठरली
 100 वर्षाचे वर सुरु असलेली परंपरा कोरोना काळात व अहेरी गाव पूर्वसन प्रकियेत खंड पडली होती. ती आता लालगुडा गावात नवीन मंदिरात नव्याने सुरु झाली आहे.

सकाळी राम जन्म कथा वाचण्यात आली. त्यानंतर गुरुदेव सेवा भजन मंडळ अहेरी यांनी आपली सेवा सादर केली. त्यानंतर काल्याचे किर्तन झाले.व सायंकाळी शोभयात्रा काढण्यात आली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();