युवा भरारीत लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत पटकवलं 'हे' क्रमांक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवा या दृष्टीने विविध विषयांवरील स्पर्धांनी युक्त असणारा युवा भरारी २०२३ हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला
    
यामध्ये पुढील विविध स्पर्धांमध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. पुष्पगुच्छ सजावट स्पर्धा कु. शोभना डी. पचारे (प्रथम), कु. मृणाली एस. पचारे (द्वितीय),  कु. संजना डी गोवारदिपे (तृतीय), रांगोळी स्पर्धा कु. संजीवनी झाडे (प्रथम), कु. सुषमा डाहुले (द्वितीय), कु. ऋतुजा उपरे (तृतीय), मेहंदी स्पर्धा कु.सारिका वर्मा (प्रथम), कु. आरती कुसनकर (द्वितीय), कु. प्राप्ती मुणोत तथा आचल ठावरी, (तृतीय), वकृत्व स्पर्धा गायत्री लोडे (प्रथम)  राज पारखी, (द्वितीय)  कु. आचल ठावरी (तृतीय), वादविवाद स्पर्धा राज पारखी (प्रथम), गार्गी देशपांडे, (द्वितीय), कु. वैष्णवी जुमडे  (तृतीय), पोस्टर प्रझेंटेशन स्पर्धा कु. अवंतिका डुकरे (प्रथम), गौरव राठोड (द्वितीय), सुषमा डाहूले (तृतीय), एकल नृत्य स्पर्धा श्री. नितीन वाघाडे (प्रथम), कु. गौरी ढेंगळे (द्वितीय), कु. चेतन गेडाम (तृतीय), आनंद मेळावा स्पर्धा कु. चैताली डोंगे व चमु (प्रथम), कु. अवंतिका डुकरे (द्वितीय), कु. रजनी गारघाटे, कु. राखी गोहणे (तृतीय), बुध्दीबळ स्पर्धा (मुले) श्रीकृष्ण म. फाले (प्रथम), साहिल र. तेलतुंबडे (द्वितीय)  कॅरम स्पर्धा (मुले) आदित्य सु. मंडवाल (प्रथम), मयांक शर्मा, (द्वितीय), आतिश कोडापे (तृतीय), एकल गायन स्पर्धा अंकिता भोयर (प्रथम), कु. कीर्ती देवतळे (द्वितीय), कु. मीनल पिंपळकर तथा चंचल मडावी (तृतीय) समुह नृत्य स्पर्धा कु. दीक्षा तेलंग व चमु (प्रथम), मोनिका जाधव व चमु, (द्वितीय), श्री. साई दुधलकर व चमु (तृतीय), क्रिकेट स्पर्धा, विनय पारखी, बेस्ट बॅट्समन, अनिकेत बुरटकर, बेस्ट बॉलर, महेश मुळे, बेस्ट फिल्डर मॅन ऑफ द मॅच रजनीश पांडे, बेस्ट ऑलराउंडर तथा मॅन ऑफ द सीरीज  बी.एस.सी. भाग दोन, उपविजेता संघ (कॅप्टन वैभव बोटरे) एम.एस.सी. क्रिकेट संघ, विजेता संघ (कॅप्टन सुरज बदकी) बुध्दिबळ स्पर्धा (मुली) कु. सायली नागतुरे (प्रथम), कु. ऋतिका भटगरे, (द्वितीय), रोशनी लालवाणी (तृतीय), कॅरम स्पर्धा (मुली) कु. प्रवृत्ती तेलंग (प्रथम), कु. दीक्षा तेलंग (द्वितीय) स्पर्धेत यांचा समावेश आहे.
           
या यशस्वी विद्यार्थ्यांसोबत सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश बोहरा, सचिव लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के यांच्यासह सर्व संचालक गण आणि प्राचार्य डॉ. प्रसाद खानजोडे यांनी अभिनंदन केले.
      
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ अभिजित अणे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ नीलिमा दवणे, डॉ विकास जुनगरी, राष्ट्रीय छात्र सेना प्रभारी डॉ.किसन घोगरे , क्रीडा समन्वयक डॉ.उमेश व्यास यांच्यासह विविध प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
युवा भरारीत लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत पटकवलं 'हे' क्रमांक युवा भरारीत लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत पटकवलं 'हे' क्रमांक Reviewed by सह्याद्री चौफेर on April 11, 2023 Rating: 5
Powered by Blogger.