व्यावसायिक शिक्षण कार्यशाळे चे आयोजन...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शिक्षण ही ज्ञान, कौशल्य, मुल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे. शिक्षण हे वारंवार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होत असते, तथापि विद्यार्थी स्वतःला शिक्षणातून सुद्धा घडवू शकतात. पण त्याला व्यावसायिक शिक्षणाची जोड असणे आवश्यक आहे,असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षणाचे ज्ञान असले पाहिजे फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर, आजच्या काळानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला व तरुण वर्गाला कोणता ना कोणत्यातरी तंत्रज्ञानाचे शिक्षण असले पाहिजे आणि शिक्षणासोबत शिका आणि कमवा असा उद्देश असला पाहिजे. त्याकरिता वणी शहरातील प्रसिद्ध विवेकानंद विद्यालय येथे दिनांक 4 मार्च 2023 ला सकाळी 7.30  वाजता शाळेतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व या विषयावर वणीतील व्यावसायिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असे, सागर मुने मार्गदर्शन करणार आहे.

 यामध्ये दहावी, बारावीनंतर कोणकोणत्या शिक्षणाने काय फायदा होतो, सकारात्मक दृष्टीकोन व्यवसायाचे मूल्य, शिक्षणाचे मूल्य, असे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी वणी परिसरातील तरुणांनी व विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे, आवाहन शाळेचे मुख्याध्यापक दिलीप आसकर यांनी केले आहे.