सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : तालुक्यात डॉ हाजरा लूटमार प्रकरण ताजे असतांना आणखीन एका महिलेला भर रस्त्यात लुटण्याचा थरार आज 27 मार्च ला घडला. मारेगाव तालुक्याच्या शेवट च्या टोकाला असलेल्या कोसारा येथील एक महिला बँकेच्या कामासाठी आली. ती वडकी वरून बँकेचे काम न झाल्याने कोसारा गावी जाण्यासाठी एका मोटारसायकल वर जात असतांना मागावरून येणाऱ्या दोन बंदूकधारी इसमानी तीची बॅग खैरी गावालगत च्या ब्रेकर वर ओढली. आणि लुटारूनी पोबारा केला. हा थरार आज मंगळवारला दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास चिंचमंडळ,धानोरा रिठ येथे घडला असून त्यामुळे ही मारेगाव तालुक्यातील दुसरी घटना असल्याने एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार भारती संजय भेदुरकर रा. कोसारा (ता. मारेगाव) ही महिला वडकी येथील राष्ट्रीयकृत बँकेत काही कामा निमित्त गेली. परंतु तीचे काम न झाल्यामुळे ती महिला गावातीलच एका दुचाकीस्वाराच्या दुचाकीने गावी परतत असताना तीच्या मागावरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वार इसमापैकी एकाने मागून तीची पर्स ओढली आणि पुढील दिशेने पोबारा केला. सदर घटना खैरी गावालगत च्या ब्रेकर घडली असून महिलेने खैरीत पोहचताच आरडाओरड करून हा प्रकार स्थानिकांना सांगितला.दरम्यान माझी जीवितहानी झाली असती तर असे महिलेने त्या दरोडेखोराला संतापून जॉबही विचारला.
दरम्यान, मोबाईल वरून पुढील मार्गांवरील महिललेने आणि सोबत च्या दुचाकीस्वाराने इतरांना संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यामुळे चिंचमंडळ येथील युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे अतुल पचारे यांनी आपल्या सवंगडयांना संपर्क साधून माहिती देत रस्ता रोखण्यास सांगितले आणि स्वतः ही चिंचमंडळ हा मार्ग निगराणीत असताना त्या दोघांपैकी एका बंदूकधारी युवकाने धानोरा रिठ ह्याकडे कूच केल्याची माहिती मिळताच खैरी व चिंचमंडळ परिसरातील नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून त्याला अतुल पचारे यांनी पकडले व वडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या थरारातील मुख्य आरोपी संतोष खिरटकर (41) रा वरोरा जि. चंद्रपूर येथील असून दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाल्याची चर्चा आहे.
