Top News

गोकुळनगर येथे श्री कानिफनाथ महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : श्री कानिफनाथ महाराज जयंतीचे औचित्य साधून आज 11 मार्च शनिवारी रोजी गोकुळ नगर, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविक रक्तदात्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आवश्यक ते योगदान द्यावे असे आवाहन सरोदे समाज संघटनेने केले आहे. 
    
संघटनेकडून नेहमीच नित्य नियमाचे समाजुपयोगी उपक्रम राबविले जातात. कोविड काळापासून रक्तापेढीची नितांत गरज लक्षात घेता, रक्तदान हेच श्रेष्ठ दान....म्हणून श्री कानिफनाथ महाराज जयंती यांच्या निमित्त आज शनिवार ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन वणी येथील गोकुळनगर येथे सकाळी 11 ते 2 या वेळात आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Previous Post Next Post