मारेगाव येथे जागतिक क्षयरोग दिन निमित्त जनजागृती


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. एकेकाळी या रोगाचा समावेश हा दुर्धर आणि कधीही बरा न होणाऱ्या रोगांमध्ये होत होता. मात्र, आता या आजारांवर अनेक औषधोपचार निघाल्याने हा रोग पूर्ण पणे बरा होतो. या आजाराबाबत लोकांच्या मनात आजही अनेक गौरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी आज मारेगाव येथे जागतिक क्षयरोग दिना निमित्त राष्ट्रीय दुरीकरण कार्यक्रम, यवतमाळ अंतर्गत शहरातून रॅली काढण्यात आली. या लक्षवेधी रॅली च्या माध्यमातून नागरिकात जनजागृती व्हावी व टीबी संदर्भात पसरलेले गैरसमज दूर करण्याचा संदेश आम्ही देत आहो असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांचा सहभाग मोठ्या संख्येने पाहायला मिळाला. 

या क्षयरोग दिनानिमित्त 'आशा दिवस'ही साजरा करण्यात आला. या दिनाच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, चे आयोजन केले होते. कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ अर्चना देठे, वैद्यकीय अधिकारी डॉ सतीश कोडापे, पिएचसी वेगांव, श्री कपिल रामटेके एसटीएस-मारेगाव, श्री घोंगे बीसी एम, श्री चौधरी कुष्ठरोग तालुका कार्यालय,मारेगाव व सामाजिक कार्यकर्ते संजय जिवने यांची उपस्थिती होती. 

या विविध कार्यक्रमात तालुक्यातील सर्व सामुदायिक आरोग्य अधिकारी, करणवाडी, बुरांडा, पहापळ, नवरगाव, व चोपण यांचा प्रामुख्याने सहभाग होता.

Previous Post Next Post