सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे त्या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. या निर्णयाने वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थावर येथील शिंदे गटाने शनिवारी फटाके फोडून जल्लोष केला.
निवडणूक आयोगाने विधिमंडळ आणि संसदेतील बहुमताच्या आधारे एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देऊन टाकले आहे. या निर्णयावर राज्यभर आनंद जल्लोष साजरा केला जात असतांना वणीत देखील बाळासाहेबाची शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद मोहितकर, उपजिल्हा प्रमुख सुधाकर गोरे, तालुका प्रमुख किशोर नांदेकर, शहर प्रमुख ललित लांजेवार, मनिष सुरावार, राजू तुराणकर, मोरेश्वर सरोदे, मारेगाव तालुका प्रमुख विशाल किन्हेकर, नाना सुगंधे, विजय मेश्राम, युवराज ठाकरे, कैलास पखाले, यांच्या सह असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थित साजरा केला.