सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख
कळंब : संयुक्त राषट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे..याचा उद्देश आहारात जास्तीत जास्त तृणधान्य चा समावेश करणे आहे. आज 18 फेब्रुवारी महाशिवरात्री आहे.या दिवशी भगवान शंकराची उपासना केली जाते. व बहुतेक लोकांना या दिवशी उपवास असतो. या दिवशी उपवासासाठी फराळ म्हणुन तृणधान्य पिक राजगिरा आणि भगर याचा महाशिवरात्री चे निमित्ताने आपल्या आहारात समावेश करावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी कार्यालय कळंब तर्फे कृषि सहाय्यक डोंगरखर्डा महेंद्र ओंकार यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षा चे अनुषंगाने तृणधान्याचे महत्त्व जनसामान्यांमध्ये वाढून तृणधान्याच्या उपयुक्त पोषण मूल्यांमुळे आहारामध्ये याचे प्रमाण वाढविण्यावर प्रयत्न केला जाणार आहे.आहारातील प्रमाणवाढवल्यास सहाजिकच शेतकरी बांधव सुद्धा तृणधान्याची पिकांची लागवड करून या पिकांचे क्षेत्र वाढ व उत्पादकता वाढीवर भर देतील. आज आपण आपल्याकडे खरीप हंगामामध्ये ज्वारी व बाजरीचे क्षेत्र फारच नगण्य किंवा दिशेनासे झाले आहे हे निश्चितच चिंतनीय आहे.आपण सर्वांनी आपल्या रोजच्या आहारात. तृणधान्याचा वापर वाढवल्यास शेतकरी बांधवांना सुद्धा एक प्रेरणा मिळून ऊर्जा मिळून तृणधान्य पिकाचे क्षेत्र तर वाढेलच व त्याला बाजारपेठ सुद्धा उपलब्ध होईल.
सध्याचे परिस्थितीत बदललेली आहारशैली मुळे मधुमेह, रक्तदाब, रक्तक्षय, हार्टअटॅक,. बद्धकोष्ठता आदी आजार उद्भवतात. पोष्टीक तृणधान्य मधे ज्वारी,बाजरी, नाचणी, वरई, राळा, कुटकी, सावा, राजगिरा ,भगर कोद्रा आदी पिकाचा समावेश होत असुन पोष्टीक तृणधान्या चे सेवनामुळे या आजारांना प्रतिबंध करता येतो.
तसेच कृषि विभागाच्या प्रधानमन्त्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजेअंतर्गत तृणधान्य पिकावर प्रक्रिया उद्योग स्थापन करून रोजगाराच्या नवनविन संधी उपलब्ध आहेत.. या योजेअंतर्गत 35% अनुदान उपलब्ध आहे. तृणधान्य वर्षानिमित्त जनजागृती व प्रचारप्रसिद्धी कृषि विभागतर्फे मा. तालुका कृषि अधिकारी एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.