सह्याद्री चौफेर | न्यूज
अमरदीप दिलीप पाटील असे गळाफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घरी कुणी नसल्याची संधी साधून त्याने गळाफास घेतला. या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.
दिलीप पाटील यांचा अमरदीप हा एकुलता एक मुलगा होता.
त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.