सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
केळापूर : तालुक्यातील सायखेडा (धरण) येथे आजपासून 18 ते 19 फेब्रुवारी या दरम्यान, शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवजन्मोत्सव सोहळा व विविध कार्यक्रमाची रेलचेल या दोन दिवसात राहणार आहे. शिवजयंती उत्सव समिती सायखेडा,यांच्या वतीने आयोजन केले आहे.
महोत्सवाचे उदघाटन 18 फेब्रुवारीला सकाळी 11. वा. रांगोळी स्पर्धा,12 वाजता रुग्णांना फळ वाटप, 11 ते 2 या वेळात रक्तदान शिबीर असणार आहे. सायंकाळी 7. वाजता वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून यात 3 ते 15 वयोगटातील स्पर्धकांना सहभाग घेता येईल.
रविवारला सायंकाळी 8.वा. ग्रामस्वच्छता अभियान, दुपारी 3 ते 6 छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन आणि शोभा यात्रा काढणार आहे. तसेच सायंकाळी 6. वाजता बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रम सभा मंडप दुर्गोत्सव, सायखेडा येथे संपन्न होणार आहे.
आजपासून होणाऱ्या कार्यक्रमाला गावातील व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती, सायखेडा (धरण) तथा ग्रामवासी यांच्या वतीने केले आहे.
