Top News

कात्री येथे दिवान मार्केटिंग योजनेच्या माध्यमातुन करोडो रूपय़ाची आर्थिक फसवणुक


सह्याद्री चौफेर | रूस्तम शेख

कळंब : कळंब तालुक्यातील कात्री येथे दिवान मार्केटिंग योजने अंतर्गत लकी ड्रॉ सुरु असून त्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांना नामात्र बक्षीशाचे आमिष दाखवून शेतकरी ,शेतमजुरांची करोडो रुपयाची आर्थिक फसवणूक होत आहे.

दिवाण मार्केटिंग योजना (लकी ड्रॉ) चालविण्या करिता संबंधित विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसून प्रशासनाला अंधारात ठेवून अवैद्यरित्या लकी ड्रॉ सुरु असल्याची तक्रार आहे . या अवैद्य लकी ड्रॉ चे व्यवसायिक कात्री येथील रहिवासी व कळंब येथील राळेगांव रोड वरील इंडियन फर्निचर चे मालक शेख शब्बीर (मोहम्मद इसराइल अब्दुल रउप) आहे. दिवान मार्केटिंग योजना (लकी ड्रा) च्या माध्यमातुन शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक फसवणुक होत असल्याची तक्रार कात्री येथील उपसरपंच शेख जमील शेख गुलाब यांनी जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ व जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या कडे दाखल केली आहे.  परंतु अजून पर्यंत संबधित विभागा कडून गांर्भियाने दखल घेतली नसुन चौकशी करण्यात आलेली नाही.
त्यामुळे कदाचित सबंधीत विभागाचे हात ओले झाले आहे का ? अशी जनसामान्यात चर्चा आहे.

या योजनेत तब्बल 1999 सभासदांचा समावेश असून त्यांच्या कडून प्रत्येकी आठवड्याला प्रति सभासद कडुन १००/- रुपये शुल्क घेतल्या जात असून एकूण 75 हप्त्याचा कालावधीचा लकी ड्रा आहे. सदर लकी ड्रा माध्यमातुन अंदाजे १ करोड ५० लाख रूपयाचा आर्थिक व्यवहार होत असल्याचे वर्तविल्या जात आहे.
आता पर्यंत तीस हप्त्यांचा लकी ड्रॉ झाला असून त्या माध्यमातून अंदाजे 60 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले असताना सुद्धा लकी ड्रा व्यवसायीक शेख शब्बीर यांनी संबंधित विभागा कडे विक्री कर भरलेला नाही त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. या वर्षी ना पिकी मुळे शेतकऱ्यांची व शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने दिवाण मार्केटिंग योजनेच्या हप्त्याची वसुली भरने अशक्य आहे.

दिवाण मार्केटिंग योजनेचे हफ्ते थकीत झाल्यास दबाव निर्माण करून सक्तीने वसुली करीत असल्याची गावा मध्ये चर्चा आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूर यांच्या मनावर मानसिक ताण वाढल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे.


 लकी ड्रॉ च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असून सभासदाने उत्तम दर्जाची वस्तुची मागणी केल्यास जे उपलब्ध आहे ते घ्यावे लागेल असे शब्द लकी ड्रॉ चालका कडून बोलल्या जात असल्याची चर्चा असून त्यामुळे नागरिकां मध्ये आक्रोश निर्माण होत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांचे आर्थिक फसवणुक होऊ नये या उद्देशाने जिल्हाधिकारी यवतमाळ, पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या कडे तक्रार केली असल्याची माहिती कात्री येथील उपसरपंच शेख जमील शेख गुलाब यांनी आमचे प्रतिनिधी रुस्तम शेख यांच्या कडे दिली आहे.

तक्रार झाल्याने लकी ड्रा चालकाचे धाबे दणानले असुन नियमितपणे दर रविवारी होणारा लकी ड्रॉ कात्री येथे झाला नसल्याने भरलेले पैसे परत मिळणार की नाही अशी सभासदा मध्ये भिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे
तरी संबधित विभागाने सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रामवासीयांनी केली आहे
Previous Post Next Post