ज्येष्ठ नागरिक भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : येथील ज्येष्ठ नागरिक भवनाचा लोकार्पण सोहळा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते 18 फेब्रुवारी 2023 शनिवारला संपन्न झाला.

श्री. सद्गुरू जगन्नाथ महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मारेगाव नगरपंचायतचे अध्यक्ष डॉ. मनिष मस्की, उदघाटक म्हणून आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, प्रमुख अतिथी म्हणून सौ. इंदुताई किन्हेकर माजी नगराध्यक्षा, शंकरराव मडावी, नगरसेवक, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णराव माकोडे, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर देशमुख, लक्ष्मण ईद्दे, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे,गजानन विधाते, नितीन वासेकर, गुलाबराव मडावी, आणि मारेगाव तालुका ज्येष्ठ मंडळाचे अध्यक्ष मारोतराव ठावरी उपस्थित होते.

यावेळी आमदार बोदकुरवार यांच्यासोबत डॉ. मनिष मस्की, इंदुताई किन्हेकर विठ्ठलराव चौधरी, दिनकरराव पावडे, कृष्णराव माकोडे, शंकरराव मडावी यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन जिजाताई वरारकर यांनी, प्रास्ताविक भास्करराव धानफुले यांनी तर आभार बी. एन. ढोके यांनी मानले.

यावेळी नामफलकाचेही अनावरण करण्यात आले. सदरील कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक ज्येष्ठ मंडळ सदस्य तसेच नागरिकांची उपस्थिती होती.