सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : लोकवाड्ःमय गृह मुंबई तर्फे काॅ.गोविंद पानसरे अभिवादन विचारयात्रा विदर्भात साहीत्य संमेलनानिमीत्य आली आहे. त्याच अनुषंगाने ही विचार यात्रा वर्धा, गडचिरोली, चंद्रपुर वरून यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरात आज दाखल झाली आहे. या विचारयात्रेचे शहरातील साहीत्यप्रेमींनी शिवतीर्थ स्मारक,टिळक चौक वणी येथे भव्य स्वागत केले आहे.
यानिमीत्य येथे ग्रंथ प्रदर्शन व स्वस्त दरात पुस्तक विक्री स्टॉलचे मा.पि.के.टोंगे सरांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी अतिथी म्हणुन मोहन हरडे, गजाजन कासावार, विलास शेरकी, कृष्णाची ढुमणे, अनिल घाटे, सुनिल गेडाम ह्यांची उपस्थित होती. या प्रसंगी संचालन सुनिल गेडाम यांनी तर आभार अनिल घाटे यांनी मानले. ही पुस्तक प्रदर्शन शहरात 12 व 13 फेब्रुवारी पर्यंत राहून साहीत्यप्रेमी, पुस्तकप्रेमींना विचारांची मेजवानी देणार आहे.