मारेगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषधं प्रशासनाची ‘मोठी’ कारवाई…


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज रविवार रोजी दुपारी साडेतीन वाजता च्या दरम्यान, शहरातील घोंन्सा रोड लगत असलेल्या एका स्विट मार्ट व्यवसायिकाच्या गोडावून वर धाड टाकून प्रतिबंधक सुगंधित तंबाखू व वाहन असा एकूण १६ लाख रुपयाच्या मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषधं प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करून जप्त केला. ही कारवाई तालुक्यातील सर्वात मोठी मानली जात असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

सविस्तर असे की, एलसीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून माजिद शेख यांच्या घोंन्सा रोड लगत एका गोडाऊन मध्ये स्विट मार्ट व्यवसायाच्या आड प्रतिबंधक सुगंधित तंबाखू चा अवैध साठा मोठ्या प्रमाणात साठवून असल्याची खबर मिळताच गोडावून मध्ये धाड टाकून प्रतिबंधक तंबाखू व वाहन हस्तगत केले. ही कारवाई यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा व व अन्न व औषधं प्रशासन विभागाने संयुक्त केली. सदर कारवाईत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू १३ लाख व वाहून नेणारे वाहन अंदाजे किंमत तीन ते चार लाख असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मागास असलेल्या तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असल्याचे बोलले जात आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोडे यांचे मार्गदर्शनात सहा. पो.नि. अमोल मुडे, घनश्याम दंडे, प्रदीप परदेशी, व जमादार आनंद आचलेवार यांनी ही केली.