Top News

टर्निंग वर असलेल्या दिशा दर्शनी बोर्डाला ऑटोची धडक; एक ठार तर चार गंभीर जखमी

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : महिलांना घेऊन जाणाऱ्या आॅटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटोची दिशा दर्शवणाऱ्या बोर्डाला धडकल्याने ऑटो पलटी होऊन 1 महिला ठार तर 4 महिला गंभीर जंखमी झाल्याची घटना आज रविवार दि.12 फेब्रुवारी रोजी ही अपघात सकाळी 9. वाजताच्या दरम्यान घडली.
मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथुन गोधणी येथे मिरची तोडण्यासाठी आॅटो निघाला एकुण 11 महिला घेऊन जात असतांना करणवाडी चौफुली वर असलेल्या दिशा दर्शनी बोर्डा वर आॅटो आदळला. या अपघातात एक जागीच ठार चार जंखमी महिलांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती आहे. 
या अपघातातील मृतक महिलेचे नाव मंदाताई सुनील रामटेके वय (45) रा. नरसाळा, तर गंभीर जंखमी मध्ये प्रिया शांताराम धुर्वे (18) रा. नरसाळा, सुनिता परमेश्वर मडावी (35) रा. नरसाळा, सुंदराबाई नामदेव आत्राम (40) रा. नरसाळा, निर्मला दिलीप आत्राम (35) रा. नरसाळा या महिला गंभीर जंखमी झाल्या असून, त्यांच्यावर मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.
आॅटो चालक महेश चांदेकर (26) रा. घोडदरा हा मद्यपानी घेऊन चालवीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याचे आॅटो रिक्षा वरून अनियंत्रण होऊन अपघात घडला अशी चर्चा आहे. 
Previous Post Next Post